आपला जिल्हा

सागरी पोलीस ठाणे जयगड,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

जयगड – दिनांक २२ जुलै २०२३ रोजी जयगड सागरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल कुलदिप पाटील यांचे जयगड खाडी परिसर बचाव कृती समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

तसेच,जयगड खाडी परिसर बचाव कृती समितीने जयगड सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदिप पाटील यांना एका निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले की, आम्ही ग्रामपंचायत जयगड उपसरपंच, सदस्य आहोत. तसेच, आम्ही पारंपरिक मासेमार सतर्क नागरिक, जयगड किल्ला प्रेमी, खाडीलगत भूमीधारक व ग्रामस्थ आहोत. जयगड खाडी मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात अती उग्र रूप धारण करित आहे. पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना तसेच किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना व पागी लोकांना जयगड खाडीच्या उग्र रूपाचा सामना करावा लागत आहे. तसेच छोट्या होडी घेऊन जाणाऱ्या मच्छीमारांना खाडीत उद्भवणाऱ्या भोवऱ्याचा सामना करावा लागतो. खाडी लगत राहणाऱ्या सर्व रहिवाशांना स्वतःचा व मुला बाळांचा जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे, कारण जयगड खाडीचे पाणी त्यांच्या घरा-दारात येऊ लागले आहे. त्याच बरोबर काही जमीन धारकांचे दगडी बंधारे फोडून जयगड खाडीच्या लाठाने त्यांच्या जमिनीची धूप केली आहे.

जयगड खाडीपात्रात ग्रामस्थ, मच्छीमार व परिसरातील लोकांची जीवित हानी होऊ नये याकरिता आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ‘जयगड खाडी परिसर बचाव कृती समिती’ स्थापन केली आहे.आमचं एकमेव उद्दिष्ट हेच आहे की, लोकांना वेळोवेळी सतर्क करणे व लोकांचा जीव वाचवणे हाच एक आमचा मुख्य उद्दिष्ट आहे,असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. त्याच बरोबर सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांचे स्वागत करून सदर निवेदन देण्यात आले आहे. या वेळी जयगड खाडी परिसर बचाव कृती समितीचे अध्यक्ष सौ.देवयानी देविदास खाडे,सचिव अमेय कृष्णा पारकर,प्रमुख सल्लागार विशाल रघुनाथ झगडे, सदस्या अक्षदा अविनाश देवरुखकर, अविनाश अरुण देवरुखकर हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button