आपला जिल्हा

मर्जीच्या तिस-या बॅचला सुरुवात

मुंबई – सामाजिक शेत्रातील दोन यशस्वी प्रयोगानंतर मेरे अधीकार मेरी जिम्मेदारी मर्जी या सामाजिक संघटनेची बेयर फूट लॉयर या प्रशिक्षणाची तिसरी तुकडी कुर्ला येथे नुकतीच सुरू झाली आहे.

कुर्ला पूर्व कामगार नगर परिसरातील ब्राईट फ्युचर संस्थेच्या केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या तिसऱ्या बॅच चे उद्घाटन मर्जी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायाधीश डॉ.डी के सोनवणे , मुंबई विद्यापीठातील नागरी शास्त्र व राज्य शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . दिपक पवार, मर्जी संघटनेचे प्रमुख मंगेश सोनवणे ऍड रमेश कदम , जेष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी याच्या उपस्थितीत , ऍड सोनाली पवार यांनी भारतीय संविधाान या विषयावर प्रशिक्षणार्त्री ना सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे मुख्य समन्वयिका प्राप्ती कोळी यांनी केले तर तूषार ढिवरे ,विवेक साळवी , यांनी मान्यवरांचे आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या समन्वयिका योगिता योगीराज गायकवाड ,विशाल वळंजू ,प्रतिभा द्रावे यांनी सक्रिय योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button