आपला जिल्हा

राजिवली ग्रामपंचायतीसमोर थकीत कराचे आव्हान ; थकबाकीदारांना नोटीस बजावणार ?

राजिवली ग्रामपंचायत १.४४ लाख थकीत कर ; पथदिवे दुरुस्तीसह कामे ठप्प.

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत समोर थकीत मालमत्ता कर आव्हान असून ग्रामपंचायतीच्या उत्पनाचे मुळ साधन असलेल्या लाखो रुपये मालमत्ता आणि वीज कर थकल्याने पथदिवे आणि छोटी छोटी कामे ठप्प पडत आहे. येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेवून करवसूली साठी पुढे यावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत मुळ थकीत करावर ५ टक्के अतिरिक्त दंड आकारण्याची तरतूद आहे. तर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याची ही तरतूद आहे. थकीत करदात्यांना करवसूलीची नोटीस बजावण्याची वेळ राजिवली ग्रामपंचायतीवर येवून ठेपली आहे.

राजिवली ग्रामपंचायत वाडीनिहाय थकीत कर

राजिवली ही गृप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तीन गावे असून राजिवली, कुटगिरी, रातांबी या तीन गावातील अनेक जणांनी मागील काही वर्षे मालमत्ता कर भरलेला नाही त्यामुळे नियमीत कर भरणा-यांवर अन्याय होत आहे. थकीत करामुळे ग्रामपंचायतीकडून होणारा विकास ठप्प होण्याची वेळ आली आहे.

  1. रातांबी :
    थकीत मालमत्ता कर – १८४१७
    थकीत वीज कर – ७६००
  2. राजिवली काळंबेवाडी:
    थकीत मालमत्ता कर – २४७३
  3. राजिवली येडगेवाडी:
    थकीत मालमत्ता कर – ४१००
  4. राजिवली बौध्दवाडी:
    थकीत मालमत्ता कर – ३२६४
    थकीत वीज कर – ५००
  5. राजिवली घाडगेवाडी:
    थकीत मालमत्ता कर – १२४२९
    थकीत वीज कर – १०००
  6. राजिवली शिर्केवाडी:
    थकीत मालमत्ता कर – ८२६८
    थकीत वीज कर – १७००
  7. कुटगिरी कदमवाडी:
    थकीत मालमत्ता कर – १८२९
    थकीत वीज कर – ५००
  8. कुटगिरी निकमवाडी:
    थकीत मालमत्ता कर – ९७१
    थकीत वीज कर – २००
  9. कुटगिरी येडगेवाडी:
    थकीत मालमत्ता कर – ७४८८९
    थकीत वीज कर – १७८००

तीन्ही गावातील एकूण थकीत मालमत्ता कर १ लाख २६ हजार ५४० रुपये असून १७ हजार ८०० रुपये वीज कर थकीत राहीला आहे. यामुळे पथदिव्यांची दुरुस्ती आणि विजबीले याच्यावर परीणाम झाला असून उर्वरीत विकास ही थांबला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button