उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण मध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संविधान वाचन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
महीला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांनी केले संविधान वाचन

चिपळूण – २२ जुलै २०२४ रोजी चिपळूण येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ.दिशाताई दाभोळकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व राज्याचा 10 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आकले नं.१ आणि गाणे जिल्हा परिषद शाळा नं.१ येथे भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी दिशाताई दाभोळकर यांनी महामानव व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधान संबंधी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व संविधानाची दुरुस्ती केली म्हणजेच संविधानात बदल केला असे होत नाही असे सांगून त्यांना संविधानाचे महत्त्व समजावले.
यावेळी त्यांच्यासोबत खेर्डी ग्रा.पं सदस्य रियाज खेरटकर,खेर्डी ग्रा.पं सदस्य राकेश दाभोळकर,साईराज सावंत,मुबिन माटवणकर,प्रसाद देवरुखकर यांच्यासह आकले ग्रा.पं सरपंच सुगंधा लांबे,माजी सरपंच सोनाली कदम,ग्रा.पं सदस्या सुमित्रा कांगणे,राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आमिन चौगुले,सामाजिक कार्यकर्ते राजाराम देवरे,शिक्षिका प्रिया खेडेकर,सुधिर मोरे,जतिन शेट्ये,विशाल जाधव,श्रीकांत कदम,रेश्मा शिंदे,अर्चना जाधव,तसेच गाणे गावच्या सरपंच अर्चनाताई गाजमल,उपसरपंच बाबा राम गजमल,सर्व ग्रा.पंचायत सदस्य,शाळेतील शिक्षक वर्ग,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते..



