माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यावर प्रभू कृपा व्हावी ; प्रभू यांना केंद्रात लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी

संगमेश्वर – सुरेश प्रभाकर प्रभू यांचा जन्म ११ जुलै १९५३ आहे. भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणी व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये २०१४ ते २०१९ पर्यंत ते रेल्वेमंत्री होते.१९९६ ते २०१४ या कालावधीत शिवसेना पक्षाचे सदस्य राहिलेले प्रभू पूर्वीच्या राजापूर लोकसभा मतदारसंघ आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून १९९६ ते २००४ दरम्यान सलग चार वेळा निवडून आले. १९९९ ते २००२ दरम्यान प्रभू अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये वने आणि पर्यावरण, खते आणि रसायन, ऊर्जा, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग इत्यादी अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.
सुरेश प्रभू यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या दादर भागातील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झाले.पुढील काळात त्यांनी महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. तदनंतर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. प्रभू हे सनदी लेखापाल आहेत. या परीक्षेत त्यांचा अखिल भारतात ११ वा क्रमांक आला होता.
सुरेश प्रभू यांनी मुंबई विद्यापीठातून चार्टर्ड अकाउंटटंची पदवी मिळवलेली आहे. ते राजकारणा प्रवेश करण्यापुर्वी सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष होते. सुरेश प्रभू यांचा सर्व सामान्य जनतेतील जनसंपर्क दाडंगा आहे. राजकारणातील निष्कलंक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या खासदार आणि मंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक चांगली कामे करण्यात ते यशस्व झाले. सुरेश प्रभू यांना जनतेसाठी प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली पाहीजे अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. सुरेश प्रभू यांच्यावर प्रभू कृपा होईल आणि त्यांना केंद्रात स्थान मिळेल या अपेक्षेने आस लावून राहीलेल्या लाखो समर्थाकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यात भाजप नेतृत्व यशस्वी होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



