अनाधिकृत फेरीवाल्यांचा पदपथावर कब्जा ; अनेक वेळा तक्रार करून सुद्धा ठोस कारवाई नाही , महापालिका अधिकारी ठोस कारवाई करणार का?
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई: महापालिका ए विभागाच्या हद्दीतील डी एन रोड वर व जे. बी पेटीट शाळेच्या बाहेरील लेन मध्ये अनाधिकृत फेरीवाल्यांनी खाऊ गल्ली बनवली आहे. दिवसभर खाण्याचे अनाधिकृत फेरीवाले रस्ता अतिक्रमण करुन अनधिकृतपणे धंदे लागत आहे. तसेच अनेक वेळा जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. लहान मुलांची बाजूला शाळा असल्याने मुलांना तसेच पालकांना तिथे ये- जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा व हॉस्पिटल च्या १०० मीटर च्या आतमध्ये फेरीवाला विभाग फेरीवाले मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते तसेच कित्येक फेरीवाले रस्त्यावर स्टोव्ह व गॅस लावून सर्रास अनाधिकृतपणे धंदा करत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे.
या परिसरामध्ये सिद्धार्थ महाविद्यालय, ई.एन.टी हॉस्पिटल ,जे बी पेटीट शाळा तसेच जे. एन पेटीट लायब्ररी आहे. यामुळे हा विभाग खूप अती दक्षता असल्याचा आहे . या अनाधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावर कब्जा केला असल्याने गर्दुल्ले वाढून घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येक वेळा नागरिकांनी व प्रवाश्यांनी तक्रार महापालिकाकडे केली असता महापालिका ठोस कारवाई फेरीवाल्यांवर करत नाही.
या गल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणत कार्यालय व छत्रपती शिवाजी महारज टर्मिनस रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रस्ता असल्याने यामुळे या लेन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. यामुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरित अनधिकृत फेरीवाल्यार कारवाई करावी.
मा. न्यालयाच्या २०१७ च्या आदेशानुसार शाळा कॉलेज, मंदिर, हॉस्पिटल व रेल्वेच्या १०० मीटर जवळ अनधिकृत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई आहे. तरीही महापालिका अतिक्रमण विभाग फेरीवाल्यांवर ठोस कारवाई का करत नाही असा प्रश्न नागरिकांना व पालकांना पडला आहे.
विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा देणार्या रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना रस्ता काढणे मोठी कसरत करावी लागत आहे. वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, अपंग नागरिक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या विभाग अतिदक्षता म्हणून आहे या लेन मध्ये शाळा महाविद्यालय ,हॉस्पिटल असल्याने खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दुल्ले यांचे प्रमाण वाढले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिका व पोलीस प्रशासनाने ठोस अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी.
– पालक
अनाधिकृत फेरीवाल्यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच कारवाई चालू आहे. व याच्यापुढे ही कारवाई चालू राहणार – जयदीप मोरे , सहाय्यक आयुक्त – ए विभाग



