आपला जिल्हा

देवरुखातील सोहम शेटये याने केला ब्राझील येथे शिप वर गणेशोत्सव साजरा

संगमेश्वर - सचिन यादव

संगमेश्वर – कामानिमित्त ब्राझील येथे असलेल्या देवरुख येथील सोहम शेटय़े यांनी यावर्षीचा गणेशोत्सव ब्राझील येथे साजरा केला आहे. घरापासून लांब असूनही आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. गावी येणे शक्य नसले तरी बाप्पाची सेवा सातासमुद्रापलीकडे ही करता आली याचा आनंद मिळाल्याचे सोहम सांगतात.

Angloeastern Ship management Company मधली Bulkcarrier FEDERAL CLYDE ship येथे सोहम शेटय़े कार्यरत आहे. सध्या ब्राझील येथे शिप लोडिंग साठी आहेत. गणेशचतुर्थीला घरी येणे शक्य नसल्याने सोहम व सहकाऱ्यांनी ब्राझील येथे शिपवर गणराय विराजमान केले होते.

एक महिन्यापूर्वी शिपच्या कॅप्टन यांनी गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना सर्वांना दिली तर सोहम यांना गणेश मूर्ती बनवण्यासाठी विचारणा करताच त्यांनी होकार दिला तसेच सर्वांच्या सहाय्याने डेकोरेशन करण्याचे निश्चित केले. शिप वरील काम चालू ठेवून प्रत्येकाने एक एक तास बाप्पाची सेवा करण्याचे ठरविण्यात आले.

गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन झाल्यावर यथोचित पूजा महाराष्ट्रातून एकमेव कर्मचारी असलेल्या देवरुखातील सोहम यांना पूजेचा मान देण्यात आला. तर शिपच्या कूकनी मोदक, तिळाचे लाडू, गुलाब जाम, मलाई बर्फी असे विविध पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले होते.

दीड दिवसांचा गणपती बाप्पाचे विसर्जन करताना सर्व कर्मचारीवर्ग भावूक झाला पण हा अनुभव सर्वांसाठी अविस्मरणीय होता. या उपक्रमाचे पहिलेच वर्ष असून उत्तम प्रकारे गणेशोत्सव साजरा झाला असे सोहम यांनी सांगितले.

यासाठी कॅप्टन ज्ञानदिप्त चौधरी, चीफ इंजिनिअर पंकज शर्मा आणि सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले असे सोहम आवर्जून सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button