आपला जिल्हा

माध्यमिक कुंभारखणी बुद्रुक हायस्कूलची एसएससी परीक्षेत १०० % निकालाची परंपरा कायम

संगमेश्वर – मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल बोर्डाकडून आज आॕनलाईन जाहीर झाला असून त्यामध्ये *मौंजे कुंभारखानी बुद्रुक ग्रामोत्कर्ष संघ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी बुद्रुक तालुका संगमेश्वर, जि. रत्नागिरी* या विद्यालयाचा एकूण निकाल १०० % लागला असून त्यात विशेष प्राविण्य ०९ प्रथम श्रेणी १८ व द्वितीय श्रेणी ०३ मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेने उत्तम कामगिरी पार पाडल्याने शाळेचे अभिनंदन होत आहे..

मौजे कुंभारखाणी बुद्रुक ग्रामोत्कर्ष संघ मुंबई ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोई पुरविण्यासाठी ओळखली जाते. परिसरातील गावातून येणाऱ्या सर्व मुलांना शिक्षण व्यवस्थेत सामावून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी देण्याचे कार्य संस्था नेहमीच करते. त्याचबरोबर व्यवसाय मार्गदर्शनाचे सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांचे भविष्यही सुरक्षित करण्यात संस्था मोलाचे योगदान देत आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी संस्था व शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.

विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करत शाळेपर्यंत पोचावे लागते. घरात शैक्षणिक सुविधांचा अभाव असतानाही सेमी इंग्रजी निवडून प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

शाळेचा एसएससी निकाल मार्च २०२४

▪️परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी – ३०
▪️उत्तीर्ण विद्यार्थी – ३०
▪️शाळेचा निकाल – १००%

विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी- ०९

प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थी -१८
द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थी -०३

गुणवंत विद्यार्थी

प्रथम- कु. धनश्री सिताराम सावर्डेकर-९१.४८% ( गाव – तळवडे )

द्वितीय- कु. वेदिका विनायक सुर्वे-८८.२०% ( गाव – कुचांबे )

तृतीय – कु. प्रणव विशाल नाचरे- ८६.६० % ( गाव मुरडव)

संस्थेचे उत्तम सहकार्य व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, उत्तम नियोजन व कार्यक्षम प्रशासन, सर्व शिक्षकांचे अभ्यासपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांचे अविरत कष्ट, नियमित जादा तासिकांचे आयोजन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व भरपूर सराव परीक्षा या सर्व बाबींमुळेच हे यश मिळू शकले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष संतोष सुर्वे , सरचिटणीस सदानंद सुर्वे, सी.ई. ओ सतीश सुर्वे , शा.समिती माध्यमिक अध्यक्ष राजेंद्र कदम शां.समिती प्राथमिक अध्यक्ष कृष्णकांत सुर्वे, प्राचार्या जाधव व्ही एल , सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले.

शाळेने संपादन केलेल्या सातत्यपूर्ण व उत्तम यशासाठी पंचक्रोशीत विविध स्तरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button