आपला जिल्हा

रत्नागिरी जिल्हा परीषदेचा भोंगळ कारभार ; बक्षिसपत्राशिवाय खाजगी जागेत ४० लाखांपेक्षा अधिकचा नियमबाह्य खर्च

संगमेश्वर – तालुक्यातील येडगेवाडी येथील भीषण पाणी टंचाई लक्षात घेवून तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सन २०१७/१८ च्या जिल्हा नियोजन समिती मधून येडगेवाडीसाठी पाऊस पाणी संकलन टाकी आणि सार्वजनिक विहीरीसाठी निधी मंजूर करुन दिला होता या टाकीचे आणि विहीरीचे काम चांगल्या दर्जाचे करुन घ्यावे अशा सक्त सूचना तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिल्या होत्या.

येडगेवाडी येथील पाऊस पाणी संकलन टाकीची पाणी साठवणूक क्षमता ६ लाख लिटर ठेवण्यात आली होती तशा पध्दतीचे काम हाती घेण्यात आले होते मात्र २०१८ ते २०२३ पर्यंत १ लिटर ही पाणी थांबू शकले नाही या बाबत येडगेवाडीकरांनी अनेकवेळा आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर येडगेवाडी या ठिकाणी बांधलेल्या विहीरत पावसाचे पाणी जात असल्याची तक्रार स्थानिकांची आहे. याबाबत राजिवली ग्रामपंचायत सरपंच यांनी पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड यांना २९ मे २०१९ रोजी काम सुरु असताना ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत तपासणी न करता बीले अदा करु नयेत असे कळविण्यात आले होते मात्र उप अभियंता आर.एल लठाड यांनी त्या कामाकडे दुर्लक्ष करुन कामाचा दर्जा न पाहता त्या ठेकेदाराची सर्व बीले अदा केली.

येडगेवाडी या ठिकाणी सन २०१९ मध्ये बांधण्यात आलेली पाऊस पाणी संकलन टाकी आणि विहीर हे नियमबाह्य असून जि.प च्या त्या दोन्हीही मालमत्ता सध्या खाजगी शेतक-यांच्या जागेत आहेत. या मालमत्तेसाठी जागामालकांकडून बक्षिसपत्र करुन न घेतल्याने साधारण ४० लाखांपेक्षा अधिक निधी हा खाजगी शेतक-यांच्या जागेत खर्च झाला आहे. आर.एल लठाड यांच्या उप अभियंता पदाच्या कार्यकाळात जि.प चा ४० लाखांपेक्षा अधिकचा निधी खाजगी जागेत खर्च करण्याला जबाबदर कोण आणि या विषयी कारवाई कोणावर होणार याबद्दल आता संगमेश्वर तालुक्यातील जनतेत उत्सुकता आहे.

संगमेश्वर तालुक्यातील पाणी पुरवठा विभागातील कामांमधील अनियमिताप्रकरणी संतोष येडगे हे आक्रमक झाले असून त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येडगेवाडी पाऊस पाणी संकलन टाकी, विहीर व तालुक्यातील जलजीवन मिशन आणि इतर कामांचे सक्षम पुरावे उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे संतोष येडगे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button