वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – चर्चगेट येथील जगन्नाथ शंकरशेठ वसतिगृहात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वसतिगृहाचे अधीक्षक डॉ. अनिल पांडे तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विधी शाखेतील विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपापल्या शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अधीक्षक डॉ. अनिल पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपल्या वसतिगृहात विविध राज्यातून विद्यार्थी निवासासाठी व मुंबई विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात. सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समजून घेऊन ते आत्मसात केले पाहिजे तसे आपले आचरण ठेवले पाहीजे असे मत यावेळी वसतीगृह अधिक्षक श्री. पांडे यांनी मांडले
तसेच यावेळी डॉ आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी समता,बंधुता व एकता यांच्या शिकवणीची सांगड घालत प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे कार्ये समजावून सांगितले. विधी शाखेचे ऍड प्रशांत कांबळे व ऍड सानप, ऍड गौरव उगळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक बळ मिळण्यासाठी व प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला…
यावेळी वसतिगृहाचे अधीक्षक , विद्यार्थी, सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते…



