उप अभियंत्यांचा काढून घेतलेला पदभार पुन्हा त्यांच्याकडेच देण्याची जि.प प्रशासनावर नामुष्की ; संतोष येडगे उच्च न्यायालयात दाद मागणार.

संगमेश्वर – तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागाचे उप अभियंता आर.एल. लठाड यांच्याविरोधात तालुक्यात प्रचंड नाराजी असून त्यांच्या विरोधात तालुक्यात २७ तक्रारी आहेत. त्या तक्रारी लक्षात घेता कोकण आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २० मार्च २०२४ रोजी त्यांच्याकडील उप अभियंता पदाचा प्रभारी पदभार काढून घेत त्यांच्या जागी तात्पुपता पदभार अनिनाश जाधव तर त्यांनतर विश्वनाथ हिंगे यांच्याकडे देण्याचे आदेश दिले होते. २० मार्च २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने ते आदेश पारीत करण्यात आले होते मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पदभार स्विकारण्यास नकार दिल्याने जि.प प्रशासनावर पुन्हा आर.एल लठाड यांच्याकडे प्रभारी पदभार ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. तालुक्यातील नियमबाह्य कामांना जि.प वरीष्ठ कार्यालयाचा पाठींबा आहे का असा सवाल आता जनता विचारु लागली आहे ? तक्रारी असणा-या उप अभियंता आर.एल. लठाड यांच्याकडे पुन्हा पदभार दिल्याने तालुक्यातील जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यांच्याकडील पदभार तातडीने काढून घेवून त्यांच्या कार्यकाळीतील सर्व कामांची निष्पक्ष चौकशीची मागणी संतोष येडगे यांनी पत्राद्वारे केली आहे.
आर.एल. लठाड यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची चौकशीची मागणी केली आहे. चौकशी निष्पक्ष करायची असेल तर त्यांच्याकडील पदभार काढून घेणे आवश्क आहे किंबहुना त्यांची त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी बदली करणे आवश्क आहे. तसे होत नसल्याने संतोष येडगे हे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन दाद मागणार आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन योजना आणि पाणी पुरवठा विभागात अनेक ठिकाणी नियमबाह्य कामे झाल्याच्या तक्रारी आहेत त्या तक्रारींवर तक्रारदारांना अद्याप समाधानकारक न्याय मिळालेला नसताना काढून घेतलेला पदभार पुन्हा आर.एल लठाड यांच्याकडे दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तावुक्यातील पाणी पुरवठा विभागातील नियमबाह्य कामे आणि तक्रारींचे स्वरुप लक्षात घेता या विषयी जिल्हा परीषद प्रशासन गंभीर नसल्याने या विषयी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे संतोष येडगे यांनी यावेळी सांगितले.



