आपला जिल्हा

मुख्य रस्ता ते रातांबी रस्ता डांबरीकरण कामाला मंजुरी ; आमदार शेखर निकम यांचा सक्षम पाठपुरावा

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली – येडगेवाडी मुख्य रस्ता ते रातांबी गाव रस्ता डांबरीकरण काम आमदार शेखर निकम यांनी मंजूर केले आहे. हा रस्ता पावसामुळे खराब झाल्याने या ठिकाणी रस्ता करणे आवश्यक असल्याची बाब राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे यांनी निदर्शनास आणून दिली होती. आमदार शेखर निकम यांनी याबात विशेष प्रयत्न करुन या रस्ता कामाला मंजुरी घेतली आहे.

रातांबी हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात छोटे स्वतंत्र महसुली गाव असून आरवली ते येडगेवाडी मुख्य रस्त्यापासून भैरवगडाच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. १२ मार्च च्या शासन निर्णयानुसार कोयना भुकंप पुनर्वसन निधी योजनेतून या कामाला मंजुरी मिळाली आहे. सध्या लोकसभेच्या आचारसंहीता सुरु झाल्याने या कामाची तांत्रिक मान्यता आणि इतर बाबी पुर्ण करुन हे काम पुढील वर्षात पुर्ण होणार आहे.

राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रातांबी – राजिवली बौध्दवाडी प्रभाग क्र. २ मधील ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे आणि तन्वी काळंबे यांच्या प्रभागातील हे काम असल्याने ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे आणि तन्वी काळंबे यांच्यासह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे तर तुकाराम येडगे यांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Back to top button