आपला जिल्हा

संगमेश्वर पंचायत समिती पाणी पुरवठा उप अभियंत्याचा प्रभारी पदभार कालमर्यादेत काढून घेण्याचे आदेश ; कामात अनियमिता केल्याच्या तालुक्यातून २८ तक्रारी.

संगमेश्वर – तालुक्यातील पंचायत समिती पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता यांच्या विरोधात संगमेश्वर तालुक्यातून जनतेच्या २८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यातील बहुसंख्य तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या असून तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने या तक्रारींचा निपटारा केला नाही त्यामुळे त्याची जिल्हास्तरीय जलजीवन मिशन तक्रार निवारण समितीने गंभीर दखल घेतली आहे. जल जीवन मिशन जिल्हा तक्रार निवारण समितीकडील तब्बल २८ प्राप्त तक्रारींवर निर्णय घेत जिल्हा तक्रार निवारण समितीने कालमर्यादीत सूचनेनुसार उप अभियंता यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा आदेश दिला आहे.

संगमेश्वर पंचायत समिती पाणी पुरवठा उप अभियंता हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन कामात अनियमिता करत असल्याचे पत्र संतोष येडगे यांनी दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी कोकण आयुक्त डॅा. महेंद्र कल्याणकर यांना दिले होते. कोकण आयुक्त कार्यालयाकडून १ मार्च २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या पत्रावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विषयी गंभीर दखल घेत सर्व तक्रारींचा अभ्यास केला असता त्या उप अभियंता यांच्या विरोधात २८ तक्रारी प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले त्यातील बहुतांश तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या असल्याचे निरीक्षण जल जीवन मिशन तक्रार निवारण समितीने मांडले आहे. जिल्हा तक्रार निवारण समितीत्या निष्कर्षानंतर पाणी पुरवठा उप अभियंता यांच्याकडील सध्याचा प्रभारी पदभार काढून घेण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्हा परीषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या खातेप्रमुख तथा कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत. तर कालमर्यादा लक्षात घेवून त्यांच्या जागी सक्षम उप अभियंता यांना पदभार देण्याच्या सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button