आपला जिल्हा

कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे यांची नियुक्ती

रत्नागिरी – कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बुधवारी सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. पुणे येथे ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणून ते काम पहात होते.

अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे तसेच बीड, अमरावती या ठिकाणी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी तर कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे.

उत्कृष्ट प्रशासन चालविणारे अधिकारी म्हणू त्यांची राज्यात ओळख आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवाशी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button