आपला जिल्हा

तळसर व डेरवण धनगरवाडी येथील ग्रामस्थांचा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटात जाहीर प्रवेश; आमदार शेखर निकम यांना खंबीरपणे साथ देणार ग्रामस्थांचा निर्धार

चिपळूण :–तालुक्यातील तळसर गावातील धनगरवाडी व डेरवण धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेश कर्त्यांचे निकम यांनी जोरदार स्वागत गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा शब्द दिला.

प्रवेशावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, मला तुमचा अभिमान आहे विकासाला प्राधान्य देत कोणत्याही दबावाला न झुकता मला साथ देत आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे यासाठी आपले कौतुक आहे. तुम्हा सर्वांचा मानसन्मान ठेवला जाईल, असा विश्वास आ. शेखर निकम सर्व ग्रामस्थांना दिला. गावाच्या विकासासाठी तुम्ही आलात. त्या विकासासाठी आपण लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. आपल्या येथे राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्यात येते, मुलांच्या शिक्षणासाठी प्राधान्य असेल हे सर्वांनाच माहीत आहे. यांची आपणास प्रचीती येईलच असे आ. निकम यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित यशवंत वरक, सुरेश बावदाने, बाबू बोंडकर, लक्ष्मण बावदाने, रामचंद्र बावदाने, बाबाराम बावदाने, चिंगळू बावदाने, बाबाराम बोडेकर, नारायण गोरे, विठ्ठल गोरे, पांडुरंग गोरे, बबन गोरे, रमेश गोरे, बाबाराम गोरे, स्वप्नील गोरे, कृष्णा गोरे, पांडुरंग गोरे, रघुनाथ गोरे, सखाराम गोरे,जाणू ढेबे, एस के ढेबे, रामचंद्र ढेबे, दत्ताराम ढेबे, यशवंत ढेबे, विजय गोरे, शांताराम गोरे, आनंद गोरे, बंडू केंडे, कोंडीबा ढेबे, जणी ढेबे, दीपाली बोडेकर, बंधू झोरे, बबन बोडेकर आदी नि प्रवेश केला.

यावेळी माजी सभापती सूर्यकांत खेतले, तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, सरपंच मयूर खेतले, माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, विधानसभा अध्यक्ष रमेश राणे, युवक अध्यक्ष निलेश कदम, प्रकाश कानसे, पांडुशेठ माळी, सचिन साडविलकर, बाबू वाजे, सिद्धी पिटले सरपंच, राम वरक, शाम खेतले, रुपेश खेतले, रोहित गमरे, प्रशांत कोलगे, रवी म्हादे, ऋषी राजेशिर्के, बावा राजेशिर्के, दीपक राजेशिर्के, समीर शिंदे, कदम वाडी ग्रामस्थ, रामा गोरे, रामा ढेबे, संतोष राजेशिर्के, विजय मोहिते, बौद्धवाडी ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button