आरोग्य व शिक्षण

शालेय विज्ञान चित्रकला हस्तकला व रांगोळी प्रदर्शन

पुणे - विलास गुरव

पुणे – भारती विद्यापीठाची सौ. विजयमाला कदम कन्या प्रशाला, एरंडवणे पुणे प्रशालेत भारती विद्यापीठाचे संस्थापक – कुलपती मा. डॉ. पतंगराव कदम साहेब यांची जयंती व भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा.आ.डॉ.विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम सप्ताह अंतर्गत प्रशालेत शालेय विज्ञान, चित्रकला , हस्तकला व रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ IMED कॉलेजचे संचालक डॉ. अजित मोरे सर उपस्थित होते. डॉ.मोरे सर यांनी विद्यार्थिनींनी बनवलेले मॉडेल हस्तकलेच्या वस्तू चित्रे व रांगोळ्यांचे बारकाईने निरीक्षण करून सर्व विद्यार्थिनींचे मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.सरांनी विद्यार्थिनींनी जिज्ञासूवृत्ती जोपासली पाहिजे.नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. असे मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या जाधव यांनी आमच्या विद्यार्थिनींनी कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे सांगितले. चित्रकला हस्तकला वस्तू तयार करण्यासाठी कला शिक्षक जगदिश कुंभार अनिल पाटील,रुपा पाटील. शितल मोरे. लता गुरव यांनी मार्गदर्शन केले.विज्ञान मॉडेल बनविण्यासाठी व उत्तम मांडणी श्रद्धा माटे , शितल विश्वासराव यांनी केले विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण वर्षा म्हेत्रे व मंजुश्री गायकवाड यांनी केले. इंजे यांनी संगणकावर प्रशालेत राबविलेल्या उपक्रमाच्या माहितीचे प्रेझेंटेशन पाहुण्यांना दाखविले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button