आपला जिल्हा

राजिवली ग्रामपंचायत नवनिर्वाचीत सरपंच दिपीका सावंत यांनी घेतली आमदार शेखर निकम यांचा भेट ; राजिवली ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन कामांबद्दल चर्चा

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत नवनिर्वाचीत उपसरपंच दिपीका दिपक सावंत यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली त्यांच्या निवडीनंतर प्रथमच त्यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आमदार शेखर निकम यांनी सरपंच दिपीका सावंत यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.

राजिवली ग्रामपंचायत हद्दीतील सुरु असलेल्या जलजीवन मिशन कामांबाबत आमदार शेखर निकम यांच्यासमवेत चर्चा केली यावेळी येडगेवाडी नळपाणी पुरवठा योजना कामातील विहीरीच्या जागेबाबत आमदार शेखर निकम यांनी पाणी पुरवठा अधिका-यांना सूचना केल्या. येडगेवाडीसाठी मुबलक पाणी मिळेल अशा ठिकाणी विहीर तयार करुन त्या विहीरीवरुन योजना करण्याच्या सूचना आमदार शेखर निकम यांनी यावेळी दिल्या आहेत.

या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे, राजविली सरपंच दिपीका दिपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य रमेश येडगे, सुधीर राजेशिर्के , दिपक सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button