आपला जिल्हा

भाविका झोरे मृत्यू प्रकरणी तपासात कोथरुड पोलिसांची प्रगती नाही ; पुणे शहर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे मांडली कैफियत.

पुणे – भाविका झोरे या विवाहीतेचा ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सासरच्या छळामुळे संशयास्पद मृत्यू झाला होता मृत्यूपुर्वी त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्येात मालवली.नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता कोथरुड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते मात्र त्यांच्या नातेवाईकांनी तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची तातडीने भेट घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

भाविका मृत्यू प्रकरणी २० महीन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटून ही पोलिसांची तपास धीम्या गतीने सुरु असून या प्रकरणी आवश्यक मुद्देमालासह पुरावे न्यायालयात सादर करण्यास कोथरुड पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर या विषयी पुणे शहर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी लक्ष घालून संबंधीत केस विषयी तपास अधिका-यांना सूचना करण्याची कैफियत मांडली आहे.

भाविका पिंगळे ही मुळची रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील रहीवासी असून तीचा १२ डिसेंबर २०१० रोजी विलास तुकाराम झोरे यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह करण्यात आला होता. लग्नानंतर फक्त ६ महीने संसार सुखी केल्यानंतर पतीकडून वारंवार अपमानास्पद वागणूक देण्याची सुरुवात झाली. भाविका व विलास यांना तीन मुले आहेत. भाविकाच्या आईने दिलेल्या तक्रारीतील माहीतीनुसार २०११ पासून भाविकाचा छळ होत होता. तीचा वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता. छळाबाबत भाविका हिने आईला फोनवरुन सांगितले होते. मात्र तिने या छळाबाबत घरच्या इतरांना व भावाला न सांगण्याची अट आई ला घातली होती. त्यामुळे आईने सांगितले नव्हते. भाविकाचा पती सुधारेल व छळाचं सुधारणा होईल अशी अपेक्षा तीच्या आईला होती मात्र तीच्या छळात वाढ होत गेली. भाविका ही वर्षातून एकदाच दिवाळी निमित्त माहेरी येत असे मात्र ती माहेरी आली की तीचा छळ वाढे अखेर तीचा या छळाने जीव घेतला आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला. भाविका हिच्या केस मध्ये गती येवून संबंधीत पुराव्यांच्या आधारे तातडीने कारवाई व्हावी अशी नातेवाईकांची मागणी आहे. त्यामुळेच रखडलेल्या तपासाला गती येण्यासाठी आता पुणे शहर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांना साकडे घातले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button