हिवाळी अधिवेशनात आ.शेखर निकम यांनी चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मांडून विधान भवनात लक्ष वेधले
नागपूर - विलास गुरव

नागपूर – महसूल वाळू धोरणबाबत बोलताना कोकणात हातपट्टीची वाळू मोठया प्रमाणात काढली जाते. ती वाळू शासन ज्याप्रमाणे ड्रेझरची विकत घेते त्याचप्रमाणे हातपट्टीची वाळू विकत घेण्याबाबत निर्णय व्हावा तसेच जे गट दिलेले आहेत त्याबद्दलची चिपळूण तालुक्यातील कार्यवाही प्रधान्याने व्हावी.
पेढे परशुराम येथील इनाम जमिनीबाबत विषय हा तातडीने सोडवण्याबाबतचा निर्णय व्हावा.
चिपळूण नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता गाळे दीर्घ मुदतीच्या भाडेपद्धतीने लिलाव स्वरुपात द्यावयाचे धोरण निश्चित करावे, जेणेकरून ते गाळे विक्रीला भाड्याने घेणे व्यापाऱ्यांना सोईस्कर होईल.
चिपळूण पूर रेषेची अंमलबजावणी व सुधारक धोरण निश्चित करून, गुजरात पॅटर्न पद्धतीने स्टील घेऊन बिल्डींगला परवानगी द्यावी म्हणजे हा प्रश्न तात्काळ सुटेल.
स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षण समाविष्ट करण्याबाबत व पॅरामेडिकल कोर्ससाठी NEET ची परीक्षा द्यावी लागते त्याबाद्दल पर्यायी दुसरी परीक्षा घेण्याबाबतचे धोरण अवलंबावावे जेणेकरून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना ते सोईस्कर होईल.
सदर प्रश्न मांडून शासनाने ते तातडीने सोडवावेत याबाबत सर्व प्रश्नाचे विश्लेषण केले.



