आपला जिल्हा

नवी मुंबई येथील दयानंद अँग्लो स्कूलची विद्यार्थिनी स्वरा पाटील हिची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत निवड

नवी मुंबई – येथील ऐरोली मधील दयानंद अँग्लो स्कूलची विद्यार्थिनी स्वरा पाटील हिची नुकतीच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.

नवी मुंबई येथे ७ ते १० डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३ पार पडल्या. यात खो-खो व धावण्याच्या स्पर्धेत राज्यातील विविध शाळातील ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. यातून नवी मुंबई येथील दयानंद अँग्लो स्कूल, ऐरोलीची विद्यार्थिनी स्वरा पाटील हिची खो-खो व धावण्याच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत निवड झाली.

स्वरा पाटील ही दयानंद अँग्लो स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत आहे. तिने मिळवलेल्या या क्रीडा स्पर्धेतील यशात तिला शाळेच्या मुख्याध्यापिका सुरुची कटारिया व क्रीडा शिक्षक संतोष सर व नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button