आरवली – येडगेवाडी मार्गावर कुंभारखाणीत मोरीला भगदाड ; एस.टी वाहतूक असुर्डेमार्गे वळवली

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली,मुरडव,कुंभारखाणी,कुचांबे,राजिवली,रातांबी, येडगेवाडी मार्गावरील कुंभारखाणी येथील मोरीला अचानक भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून या मार्गावरील देवरुख आगारातून येणा-या बस असुर्डे मार्गे वळविण्यात आल्या तर दुपारी चार वाजता येडगेवाडी येथून सुटणारी येडगेवाडी – माखजन ही बस येगांव असुर्डे मार्गे गेल्याने मुरडव येथील कुंभारखाणी हायस्कूल ला येणा-या विद्यार्थ्यांना चालत घर गाठावे लागले.

आरवली – येडगेवाडी मार्गावरील कुंभारखाणी येथीव मोरीला भगदाड पडल्याची बातमी समजताच कुंभारखाणी पोलिस पाटील राकेश सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेत त्या ठिकाणची वाहतूक थांबवत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले. घटनास्थळाची सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे,राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी चे जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे, कुटगिरी पोलिस पाटील शांताराम निकम, यांनी पाहणी केली.



