आपला जिल्हा

दत्तजयंती उत्सवानिमित्त कोंडगाव येथे सात दिवस भागवत कथेचे आयोजन

संगमेश्वर – तालुक्यातील कोंडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पवित्र काजळी नदीच्या शेजारी औदुंबराच्या छायेखाली असलेल्या अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त देवस्थान कोंडगाव येथे भव्य पटागणात भागवत कथा सांगितली जाणार आहे

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कीर्तनकार प्रवचनकार समर्थ भक्त मकरंदबुवा सुमंत (रामदासी ) पुणे यांच्या ओघवत्या व रसाळ वाणीतून भागवत कथा सांगितली जाणार असून १३ डिसेंबर २०२३ ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत सायंकाळी ४ ते रात्री ८-३०या वेळेत ही कथा ऐकवली जाणार आहे.

यासाठी साथ संगत

संवादिनी – सुशिल गद्रे ,पुणे

तबला विश्वास जोशी कुर्धे,

बासरी आदित्य गोगटे नागपूर,

संहिता वाचक गोविंद मांडवगणे पुणे यांची साथ लाभणार आहे.

संहिता वाचन रोज सकाळी आठ वाजता होणार असून भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे भागवत कथा अर्थात श्रीमद भागवत महापुराण ही भगवंतांची मूर्ती असून संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे मन शुद्ध करणाऱ्या अमृताचे नाव आहे श्रीमदभागवत अबालवृद्धांच्या मनावर अधिराज्य असलेल्या सर्वांचा योगक्षेम चालणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा समग्र जीवनपट उलगडणारे परम पवित्र श्रीमदभागवत ऐकणे म्हणजे महापर्वणीच!

जन्मान्तरे भवेतू पुण्य तदा भागवंत लाभेन अर्थात अनेक जन्माच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते

यासाठीच श्री दत्त देवस्थान कोंडगाव (साखरपा )न्यास यांनी आयोजित केले असून भक्तगणांनी भागवत कथा ऐकण्याच लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button