आपला जिल्हाताज्या घडामोडी

धामणी ग्रामपंचायत येथे मेरी मिट्टी मेरा देश हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला ; गावातील माजी सैनिक आणि निवृत्त पोलिस अधिका-यांचा सन्मान

संगमेश्वर - सचिन यादव

संगमेश्वर – यावेळी उभारण्यात आलेल्या शौर्य शिळेचे अनावरण करण्यात आले याचं कार्यक्रमात गावातील माजी सैनिक यांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होतं आहे या निमित्ताने देशभर मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबविण्यात येत आहे .

संगमेश्वर तालुक्यातील धामणी मध्ये या अभियानाचा प्रारंभ सोमवारी ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाला ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात शौर्य शिळेचे अनावरण करण्यात आले या शौर्यशिळेकडून प्रेरणा घेऊन शाळेय विद्यार्थ्यांच्या मनात सैन्यात जाण्याची उर्जा निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मनोगत व्यक्त करताना गावातील माजी सैनिक श्री नामदेव करंडे यांनी १९७६ या दरम्यान भारत पाकिस्तान युध्दातील अनुभव कथन केला ते म्हणाले की त्यावेळी पाकिस्तानचे १०० सैनिक पकडण्यात आले होते त्यावेळी प्रधानमंत्री यांच्या आदेशाने ते सैनिक त्यांच्या ताब्यात देण्यात आले आणि आपल्या देशाची इंचभर ही जागा पाकिस्तानला दिली नाही असे अनुभव त्यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर गावातील तरुण पिढीला सैन्यदलातील भरती बाबद मार्गदर्शन केले पाहिजे तसेच एप्रिल मेमध्ये गावातील तरुण मंडळी यांना सर्व विषयांची माहिती व्हावी यासाठी गावातील शासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी वर्ग यांचें मार्गदर्शन गावातील तरुण पिढीला लाभावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले याचे लवकरच नियोजन करुया असे सर्वांनीच एकमुखाने सांगितले.

गावातील माजी सैनिक तसेच निवृत्त पोलिस अधिकारी यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला
ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले तसेच शपथ घेतली गेली तसेच माजी सैनिक आणि निवृत्त पोलिस अधिकारी राष्ट्रसेवेबद्दल आभार व्यक्त करण्यात आले

कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्या , ग्रामसेवक तलाठी, आरोग्य विभागाचे कर्मचारी,शाळेचे मुख्याध्यापक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, विविध अधिकारी, तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button