आपला जिल्हा

खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून मंजूर झालेल्या धामनवणे गावाची ग्रामदेवता आई विठ्ठलाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन

चिपळूण – खेर्डी ज़िल्हा परिषद गटातील धामनवणे गावाची ग्रामदेवी आई विठ्ठलाची देवस्थान कडे मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब होता सदर रस्ता चांगला झाला पाहिजे आणि निधी मिळावा या साठी ग्रामपंचायत सदस्य शिवसेना उपविभाग प्रमुख श्री.नितीन शिगवण तसेच मा सदस्य श्री राजुशेठ पवार आणि ग्रामस्थानी युवासेना तालुका प्रमुख श्री उमेश खताते यांच्या कडे मागणी केली असता सर्वानी शिवसेना नेते खासदार श्री विनायक राऊतसाहेब यांची भेट घेत लवरच रस्ता मंजूर व्हावा हि विनंती केली याची दखल घेत श्री विनायक राऊत साहेब यांनी सदर रस्त्यासाठी 8 लक्ष रुपये मंजूर केले

आज सर्व गावातील लोकांच्या साक्षीने आई विठ्ठलाई च्या आशीर्वादाने शिवसेना तालुका प्रमुख श्री विनोदजी झगडे ,आणि युवासेना तालुका प्रमुख श्री उमेश खताते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले

यावेळी उपसरपंच सौ.लक्षुमी वरेकर,विठ्ठलाई देवस्थान वर्धापन दिन अध्यक्ष श्री राजू शेठ पवार,शिवसेना उप विभाग प्रमुख ग्रामपंचायत सदस्य श्री,नितीन शिगवण,तंटामुक्ती अध्यक्ष श्री भूषण कांबळी,देवस्थान सेक्रेटरी श्री विनायक महाराज पिटले,मा सरपंच श्री संतोष उंडरे,मा उपसरपंच श्री रामचंद्र उंडरे,मा ग्रामपंचायत सदस्य श्री दीपक सावंत,श्री अशोक पवार,प्रकाश कांबळी,देवस्थान विश्वस्त श्री शांताराम शिगवण,बोद्धवाडी अध्यक्ष श्री अविनाश जाधव,श्री दत्ताराम उंडरे,यशवंत उंडरे,श्री संदीप खांबे,राजा बुवा शिगवण,श्री मंगेश उंडरे,श्री संतोष वरेकर,श्री मनोहर शिगवण,श्री संदीप जड्याळ,योगेश उंडरे,अप्पा लालीम,गीतेश सावंत,श्री पाडुंरंग उंडरे,श्री शांताराम उंडरे,श्री मनोहर पिटले,श्री रमेश शिगवण,श्री महादेव पिटले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

सदर रस्ता मंजूर करून दिल्या बद्दल शिवसेना नेते लोकप्रिय खासदार श्री विनायक राऊत साहेब यांचे ग्रामस्थानी आभार मानले तसेच पाठपुरावा केल्या बद्दल युवासेना तालुका प्रमुख श्री उमेश खताते आणि ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन शिगवण यांचे आभार मानले

रस्ता पूर्ण झाल्यावर शिवसेना खासदार श्री विनायक राऊतसाहेब यांच्या हस्ते सदर रस्त्याचे उदघाट्न करण्यात येणार आहे असे शिवसेना तालुका प्रमुख श्री विनोदजी झगडे यांनी नमुद केले

Related Articles

Leave a Reply

Back to top button