आपला जिल्हा

लक्ष्मीपूजन च्या मुहुर्तावर आरवलीत येडगे जनसेवा कार्यालयाचे उद्धाटन ; आमदार शेखर निकम यांची कार्यालयाला भेट

संगमेश्वर – तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गावरील आरवली या ठिकाणी जनतेची कागदोपत्री कामे व्हाावीत म्हणून तुकाराम येडगे यांनी आज दिवाळी लक्ष्मीपूजन च्या मुहुर्तावर येडगे जनसेवा कार्यालय सुरु करत या कार्यालयाचे उद्धाटन केले या कार्यालयाला चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तर आजूबाजूच्या गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व मानकरी आणि इतर ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या.

आरवली पासून माखजन पर्यंत आणि आरवली पासून येडगेवाडी पर्यंत असणा-या सर्वच गावातील जनतेला या जनसेवा कार्यालयाचा लाभ होणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणा-या शासकीय कागदपत्रांपासून शासकीय योजना आणि इतर दाखले मिळवून देण्यासाठी हे कार्यालय जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

आरवली येथील येडगे जनसेवा कार्यालयाला खरी लोकजागृती चे संपादक संतोष येडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, आंबव सरपंच शेखर उकर्डे, कुंभारखानी उप सरपंच अनिल सुर्वे, माजी पंचायत समिती सदस्य नाना कांगणे, संगमेश्वर तालुका धनगर समाज अध्यक्ष दत्ताराम शेळके, मुरडव सरपंच नितीन मेने, मुरडव पोलीस पाटील राजा मेने, राजिवली ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे, राजिवली ग्रामपंचायत माजी सदस्य सचिन कदम, लक्ष्मण कदम. जितू पाटोळे, हरी घाडगे, जनार्दन पाटोळे, अक्षय चव्हाण, नितेश पवार, विलास जागुष्टे, शंकर जागुष्टे आदींसह पंचक्रोशीतील अनेक नागरीकांनी आपली उपस्थिती लावत तुकाराम येडगे यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button