खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी दिली राजापूर शहरातील जवाहर चौकातील नवरात्र उत्सवाला भेट

राजापूर – शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार मा.विनायक राऊत व उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी तसेच जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी जय महाराष्ट्र मित्र मंडळ, वरची पेठ, जवाहर चौक येथील चव्हाटा नवरात्र उत्सव मंडळ येथे नवरात्र उत्सवा निमित्त भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी मंडळ च्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा समन्वयक दिनेश जैतापकर, जिल्हा युवाधिकारी विनय गांगणं, विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, उप जिल्हा युवाधिकारी संतोष हातणकर, महिला शहर आघाडी वीणा विचारे, शहर युवाधिकारी श्रीनाथ चव्हाण, युवती सेना शहर प्रतीक्षा मांजरेकर व अन्य सर्व उप तालुकाप्रमुख, विभागीय संघटक, विभागप्रमुख, उप विभागप्रमुख,आजी माजी जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरसेवक, शिवसेना, युवासेना, महिला कार्यकारणी, शिवसहकार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, वकील बार सेना, आरोग्य सेना, बँक संचालक, आजी माजी सदस्य नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.



