आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट? कुटुंबीयांनी पोलिसांना दिली महत्त्वाची माहिती

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली असतानाच आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीलिमा चव्हाण ही ज्या एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या दापोली शाखेत कंत्राटी पद्धतीने काम करत होती त्याच बँकेतील एक कर्मचारी तिच्यावर वारंवार कामासाठी दबाव टाकत होता, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दिली आहे. या प्रकरणाचा तपास सगळ्या बाजूने जिल्हा पोलीस प्रशासन कसून करत आहे. या प्रकरणामध्ये आता या बँकेच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.



