आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवारांच्या विचारांचा वारसा नव्या जोमाने काम करून संघटनात्मक बांधणीचा संकल्प करून आपली ताकद दाखवून द्या ; नुतन जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर याचे आवाहन

देवरुख - सुरेश सप्रे

देवरुख – शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना केली तेव्हा पासून त्याच्या विचाराने प्रेरित होवून जिल्हात राष्ट्रवादीची संघटना मजबुत केली. आता काहींनी बेरजेचे राजकारण करत सर्व पदे भोगून मोठे झालेल्यांनी पवारसाहेबांना अंधारात ठेवून गद्दारी केली आहे..पक्षाशी गद्दारी करत गेलेल्यापाठी काही जण स्वार्थी साधणेसाठी गेलेत. त्यां गेलेल्यांचा विचार आपण न करता आपापसता मतभेद व मनभेद बाजूला ठेवत १९९९ सारखेच शरद पवारांच्या विचारांनी प्रेरीत होत पुन्हा नव्या जोमाने काम करून पक्षाची संघटनात्मक बांधणी करून आपली ताकद दाखवून देवू असा निर्धार करूया असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केले

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हय़ाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष पदी सुदेश मयेकर यांची निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा व सत्कार करणेसाठी देवरूख येथे राष्ट्रवादी काँग्रेसची( शरद पवारगट) बैठक आयोजित करण्यात आली होती.

सभेला महिला नेत्या नलूताई भुवड. चित्राताई चव्हाण (महिला जिल्हा अध्यक्ष) शिवलतर ( ओबीसी जिल्हा अध्यक्ष.) निलेश भूवड.( विधानसभा क्षेत्र अध्यक्ष.) बारक्याशेट बने. (राज्य चिटणीस) नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाबा साळवी रत्नागिरीत तालुकाध्यक्ष राजन सुर्वे. आदींसह तालुक्यातील तालुक्यातील सुमारे ५०चेवर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकित जिल्हात संघटन वाढविणे तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी नियुक्ती करणे या विषयी चाचपणी करणेत आली. ही पक्षाची बांधणी करताना तरूणांना व महिलांना जास्ती जास्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे..

जिल्हात राष्ट्रवादीच्या स़्थापनेपासून पक्षाची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांची फौज अजून हि मोठी असल्याचे आज दिसून आले आहे.

या संगमेश्वर चिपळुण मतदार संघातील अनेक जणांनी आम. शेखर निकम यांनी अजीत पवार यांचे उघड उघड समर्थन देत पक्षाची प्रतारणा करत त्यांचे गटात प्रवेश केला असला तरी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे शरद पवारांच्या विचारांचे समर्थक आहेत.. त्यामुळे गेल्यांचा विचार न करता आपल्या संघटन वाढीसाठी कटीबद्ध होत परत लक्षवेधी भरारी घेवू असा विश्वास महिला नेत्या नलूताई भुवड यांनीव्यक्त केला.

मी मागिल विधानसभा निवडणुकी पुर्वी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद नसताना हि शेखर निकमसरांनी विनंती केलेवर राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केला होता.. तीच परिस्थिती आज आम. निकम यांनी शरद पवारांच्या विचाराला तिलांजली देत कार्यकर्ते यांचा विश्वासघात करत दादाचा हात पकडला आहे.. ते आपल्या समर्थकांसह गेले असले तरी तालूक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारानी प्रेरीत होवून आगामी निवडणुकीत ताकद दाखवून देवू असा विश्वास राज्य चिटणीस सुरेश बने यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली असून शरद पवार गटाची ताकद दाखविणेचीसाठी तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तालुकाध्यक्ष म्हणून बाबा साळवी यांची नेमणूक करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र हि जिल्हाध्यक्ष मयेकर यांचे हस्ते देण्यात आले. व त्याचा जिल्हाध्यक्ष मयेकर व मान्यवरांचेवतीने सत्कार करणेत आला.
सद्यस्थितीत हे चित्र स्पष्ट नसले तरी आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजीत पवार गटासाठी हे धोकादायक ठरू शकते.!
बैठकीचे सुत्रसंचन अयुब कापडी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button