जिल्हा परिषद विविध पदभरती २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज

रत्नागिरी – जिल्हा परिषद विविध पदांची भरती करण्यात येत आहे त्याची जाहिरात रत्नागिरी जिल्हयाचे https//www.zpratnagiri.org / व https//ratnagiri.gov.in/ या संकेतस्थळावर ही उपलब्ध आहे. वरील पदांसाठी सामाजिक/ समांतर आरक्षणनिहाय पदांची माहिती, पदनिहाय शैक्षणिक अर्हता. इतर आवश्यक अर्हता व अनुभव, कमाल व किमान वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज भरणेसाठी मार्गदर्शक सूचना, परीक्षेचे स्वरुप व परीक्षा माध्यम, निवडपध्दती, सर्वसाधारण अटी व शर्ती, इत्यादींबाबत सविस्तर माहिती या जाहिरातमध्ये उपलब्ध आहे.सदर पदभरती ही ऑनलाईन पध्दतीनेच होणार असलेने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https//ibpsonline.ibps.in/zpvpjun23 हे अधिकृत संकेतस्थळ 25 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री 11.59 वाजेपर्यंत कार्यरत राहील व त्या दरम्यानेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पर्यवेक्षिका/मुख्यसेविका या 18 संवर्गातील एकूण 715 पदे सरळसेवा पध्दतीने पदभरती करण्यात येणार आहे.



