आपला जिल्हा
मौजे असुर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे संकेत चंद्रकांत गुरव यांनी मारली बाजी..
आमदार शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा.

संगमेश्वर – तालुक्यातील मौजे असुर्डे ग्रामपंचायती मध्ये उपसरपंच सौ दिक्षा खानविलकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आज नव्याने उपसरपंच निवड करण्यासाठी निवडणूक झाली प्रतिषठेच्या निवडणूकित चूरस निश्चितच होणार असे दिसत होते त्याच प्रमाणे आमदार शेखर निकम यांचे निष्ठावंत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तरुण कार्यकर्ता संकेत चंद्रकांत गुरव यांनी विरोधी उमेदवार अनिल मुंडेकर यांचा पराभव करून उपसरपंच पदी बाजी मारली.
मौजे असुर्डे च्या उपसरपंच पदी निवड झाल्या बद्दल आमदार शेखर निकम यांनी शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुराद आंबेडकर कोंड असुर्डे चे माजी सरपंच श्रीराम शिंदे, राकेश जाधव, प्रतीक सावंत, महेंद्र मनवे सर्व गावातील जेष्ठ मंडळी व तरुण सहकार्यानी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या..



