आपला जिल्हा

वाशिष्ठी मच्छीमार संस्थेच्यावतीने ई-श्रम कार्ड शिबिर संपन्न ; ७०० सदस्यांनी घेतला लाभ; मत्स्य व्यवसाय विभागाचा सहभाग

चिपळूण – वाशिष्ठी मच्छीमार संस्थेच्या वतीने आणि मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गोवळकोट येथे ई-श्रम कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून जवळपास ६०० हून अधिक ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळणार आहे. ई-श्रम कार्डमुळे मच्छीमार म्हणून मत्स्य विभागाकडे नोंदणी होणार असून व्यवसाय दरम्यान अपघात झाल्यास दोन लाखाचा विमा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गट विमा काढल्यामुळे पाच लाखाचा विम्याचा लाभ मच्छिमार बांधवांना मिळणार आहे.

गोवळकोट भोईवाडी येथे आयोजित या शिबिराला ७०० हून अधिक सभासदांनी सहभाग घेतला. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे मिळणाऱ्या लाभाचा पाठपुरावा वाशिष्ठी मच्छिमार संस्थेतर्फे केला जातो. शासनाच्या योजना आणि त्यांचा लाभ मिळावा यासाठी ही संस्था अनेक वर्ष काम करत आहे. वाशिष्ठी मच्छीमार संस्थेच्या वतीने अध्यक्ष कृष्णा पडवळ, उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, सचिव प्रमोद सैतवडेकर, सदस्य कुंदन जाधव, सुनील जूवळे, सिद्देश कासेकर, राजेश सैतवडेकर यांनी शिबिराचे नियोजन केले होते. मस्त्य व्यवसाय रत्नागिरी गुहागर शाखा यांच्या वतीने पुनम कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. शिबिर यशस्वी करण्यासाठी गोवळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि संस्थेच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button