खेड भरणे उड्डाणपुलाला शिक्षणमहर्षी माजी आ. तु. बा.कदम यांचे नाव द्यावे ; खेड संघ शाखेच्या सभेत सर्वानुमते केला ठराव
संघाचा १०३ बा वर्धापनदिन व तु. बा. कदम यांची पुण्यतिथी कार्यक्रम

चिपळूण – खेड येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचा १०३ वा वर्धापन दिन आणि शिक्षण महर्षी, लोकनेते ,माजी आमदार तु. बा. कदम यांची १३ वी पुण्यतिथी कार्यक्रम साखरोली महादेवाडी येथे पार पडला. यात महत्वपर्ण दोन ठराव सर्वानुमते करण्यात आले.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई खेड ग्रामीणचे फुरुस विभागाचे अध्यक्ष आत्माराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात माजी आ. तू. बा. कदम यांच्या कार्यप्रणालीला उजाळा दिला. याच वेळी
सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव समाज भूषण पुरस्कार प्रदान करून करण्यात आला . यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार बाबाराम (मामा) तळेकर यांना गुहागरचे राजेश बेंडल आणि मंडणगड येथील प्रकाश शिगवण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनतून तु. बा. कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. सध्याच्या आरक्षणाविषयी चर्चा घडवून आणली. या सामाजिक मेळाव्याचे औचित्य साधून अमित कदम यांनी दोन प्रस्ताव मांडले.
मुंबई गोवा महामार्ग एन एच ६६ यासाठी लोकनेते शामरावजी पेजे साहेब यांचे नाव द्यावे. तसेच भरणे येथील उड्डाणपुलाला शिक्षणमहर्षी माजी आमदार तु. बा. कदम यांचे नाव द्यावे. हे दोन्ही ठराव सर्व समाज बांधवांनी एकमुखाने संमत केले. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे ठरवले.
या कार्यक्रमाला गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, मंडणगडचे माजी जि. प. सदस्य प्रकाश शिगवण, ग्रामीणचे अध्यक्ष अमित कदम, बाबाराम तळेकर, युवा अध्यक्ष श्रीकांत कदम, साखरोली सरपंच सौ. अमृता कदम, ओबीसी अध्यक्ष दीपक शिगवण, कुणबी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास धामणे, सुधीर वैराग,संदीप तांबट, प्रवीण गीते, दीपक खाडे, सुभाष हुमणे, मदन खामकर, काताळे सर, वैभव आदवडे, माजी सरपंच भुवड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रदीप धाडवे यांनी तु. बा. कदम साहेबांवर गौरवगीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळू सनगरे यांनी केले.



