तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयाचे सुयश

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालित दादासाहेब सरफरे विद्यालय आणि बुरंबी पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. १४ वर्षे वयोगट, १७ वर्षे वयोगट, १९ वर्षे वयोगट मुला-मुलींच्या संघाने खो-खो व कबड्डी क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे.
तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच कोसुंब येथे पार पडल्या. या क्रीडा स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात १७ वर्षे वयोगट मुलगे विजेता व १९ वर्षे वयोगट मुलगे उपविजेता ठरला. कबड्डी क्रीडा प्रकारात १४ वर्षे वयोगट तसेच १७ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने व मुलींच्या संघाने दोन्ही वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच बुरंबी कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील कबड्डी क्रीडा प्रकारात मुली व मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अशोकभाई सरफरे, उपाध्यक्ष श्री. राजाराम गर्दे, उपाध्यक्ष श्री. शांताराम भुरवणे, सचिव श्री. शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, संस्थाचालक श्री. दिनेश जाधव, श्री. सचिन मोहिते, श्री. ललित लोटणकर मुख्याध्यापक श्री. प्रकाश विरकर, पर्यवेक्षक श्री. महावीर साठे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. महावीर साठे, श्री. सुहास पाब्ये, श्री सुरेंद्र कुळये, श्री. सुरज जाधव, श्री. सुनिल पवार, सौ. स्वरुपा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.



