एखादी संस्था 75 वर्षे टिकवणे खुप कठीण – आ. शेखर निकम

चिपळूण – एखादी संस्था जगवणे, वाढवणे आणि टिकवणे खूप कठीण असते. त्यामुळे अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या ‘शिक्षण प्रसारक संघ मौजे पेढांबे’ या संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांचे विशेष अभिनंदन.
शिक्षण प्रसारक संघाच्या अमृत महोत्सव सोहळ्यात पेढांबे गावातील विद्याविभूषित तसेच दसपटीतील राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार,प्रतिश्चितांचा गुणगौरव आमच्या हस्ते करण्यात आला. हे आमचे भाग्य या वेळी उपस्थित गुहागर मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव,विधानपरिषद पेढांबे गावचे सुपुत्र आमदार सुनील शिंदे, माझी आमदार रमेशभाई कदम, प्रताप शिंदे, शशिकांत शिंदे,अशोक शिंदे, इंद्रसेन चव्हाण, सार्थकी शिंदे, राजेन्द्र कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते .
हा सोहळा यशस्वी करण्याकरीता संघाचे अध्यक्ष इंद्रसेन चव्हाण, कार्याध्यक्ष नितिन शिंदे, उपाध्यक्ष संभाजीराव शिंदे व भगवान शिंदे, संक्रेटरी प्रमोद आ. शिंदे, खजिनदार अजित शिंदे, कार्यकारीणी सदस्य राकेश कदम, अजय शिंदे, प्रमोद शिंदे व विष्णू शिंदे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी प्रंचड मेहनत घेतली.



