रत्नागिरी पंचायत समिती माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल एक वर्षाने सापडला ?

रत्नागिरी – रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल एक वर्षानंतर सापडला आहे. वर्षश्राद्धाच्या दिवशी त्यांचा मोबाईल सापडल्याने खून प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती सापडला आहे.
गतवर्षी पती सुकांत उर्फ भाई सावंत, कामगाराच्या मदतीने सौ. स्वप्नाली सावंत यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती. पोलिसांनी खून प्रकरणातील सर्व धागेदोरे कटाक्षाने तपासले असून पतीसह आणखी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. सौ.स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी या खून प्रकारणात पोलिसांनी रक्त, जाळून टाकलेली हाड, काही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले होते.
भाई सावंतने पत्नी स्वप्नाली सावंतला मारून टाकून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह त्याच्याच घराजवळ जाळून सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. स्वप्नाली सावंतचा मोबाईल सापडल्याने काही गोष्टीचा उलगडा होणार आहे.



