भाजपतर्फे १ आँक्टोबरला सेवा पंधरवडा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
देवरुख - सुरेश सप्रे

देवरूख – भारतीय जनता पार्टी चिपळुण – संगमेश्वर व वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर देवरूखात लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय माणिक चौक, येथे १ ऑक्टोबर २०२३ रोजी सखा. १०.३९ते ३.३०या वेळेत आयोजीत करणेत आले आहे.
या शिबिरात हर्निया. मुतखडा. अल्सर टॉन्सिल्स. चरबीच्या गाठी
अपेंडिक्स. मुळव्याध. मोतीबिंदू कानाच्या पडद्याची तपासणी
प्रोस्टेट ग्रंथी. महिलांची गर्भाशय तपासणी.पित्ताशयातील खडे आदींची मोफत तपासणी करण्यात येणार आहे..
जनरल सर्जन • अस्थीरोग तज्ञ • नेत्र रोग तज्ञ • स्त्री रोग तज्ञ • जनरल मेडिसीन • नाक, कान, घसा तज्ञ यांचेसह विशेष तज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार आहेत.
तसेच तपासणी दरम्यान एखादा रुग्ण शस्त्रक्रिया करण्या योग्य आढळल्यास पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या रुग्णांच्या मोतीबिंदू, मुतखडा, प्रोस्टेड ग्रंथी, अँजिओप्लास्टी, बायपास इत्यादी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील तसेच इतर शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येतील.
सुचना :- येताना आपले मुळ रेशनकार्ड, ओळखपत्र, जुने तपासणी रिपोर्ट घेऊन यावेत.



