भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांचे बुथ सक्षमीकरणासाठी प्रयत्न ; वाघणगांव येथे बाप्पांचे दर्शन घेवून बुथ सक्षमीकरणासाठी स्थानिकांसोबत साधला संवाद

लांजा :- भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघात बुथ सक्षमीकरण काम जोमाने सुरु केले असून गावागावांत बैठका घेत केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेची माहीती देत आहेत तर त्या योजनेचा थेट लाभ स्थानिक जनतेला व्हावा म्हणून त्यांच्या स्तरावर शासन दरबारी सक्षमपणे पाठपुरावा करत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा, जि.प, पं.स आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप ला शतप्रतिशत यश यावे आणि लोकप्रतिनिधींची संख्या वाढावी म्हणून भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काम करत आहेत. स्थानिक जनतेच्या समस्या राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न सुरु आहे.
राजापुर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रातील बूथ क्रमांक १०९ वाघणगाव येथे भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत बुथ सक्षमीकरणासाठी स्थानिकांसोबत संवाद साधला यावेळी भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर आणि इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



