ताज्या घडामोडीनिवडणूकमहाराष्ट्र
छाननी प्रक्रियेसाठी युवासेना उमेदवारांनी मुंबई विद्यापीठांत उपकुलसचिव डावरे यांच्या कार्यालयात घातला घेराव
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणुक १० सप्टेंबर,२०२३ रोजी होऊ घातली होती,सदर निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १८ ऑगस्ट,२०२३ रोजी *स्थगिती* नंतरही अर्ज अनामत रक्कम घेऊन स्विकारण्यात आले होते,आज २१ ऑगस्ट,२०२३ रोजी निवडणूक कार्यक्रमात जाहिर असल्याप्रमाणे *उमेदवारी अर्ज छाननी करणे* आहे त्यानुसार युवासेनेचे सर्व दहा उमेदवार विद्यापीठात हजर होते परंतु एकही वरीष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यामुळे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव श्री.विकास डवरे,अतिरीक्त निवडणूक अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता छाननी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना युवासेना उमेदवारांनी *घेराव* घातला.



