आपला जिल्हा

टेरवचे, मुंबई उपनगर संघातून तीन वेळा निवड झालेले ठाणे शहर पोलीसचे कबड्डी खेळाडू विकास कदम यांचे दुःखद निधन

चिपळूण - विलास गुरव

ठाणे – शहर पोलीस आयुक्तालय विशेष शाखा ठाणे येथे कार्यरत असलेले दसपटी विभागातील टेरव गावचे सुपूत्र, ठाणे पोलीस तसेच झुंजार क्रिडा मंडळ, घाटकोपरचे कबड्डी खेळाडू कै. विकास शिवरामराव कदम यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सेवा निवृत्तीस अवघे १५ दिवस बाकी असताना, दिनांक १४ सप्टेंबर, २०२३ रोजी दुःखद निधन झाले. कै. विकास कदम यांनी उत्कृष्ट खेळ करत ठाणे पोलीस तसेच झुंजार क्रिडा मंडळ घाटकोपर कबड्डी संघास अनेक विजय प्राप्त करून दिले आहेत. तसेच उत्कृष्ठ खेळामुळे त्यांची मुंबई उपनगर कबड्डी संघातून तीन वेळा निवड झाली होती. प्रत्येक वेळी अप्रतिम खेळ करून त्यांनी मुंबई उपनगर संघास घवघवीत यश प्राप्त करून दिले होते. ठाणे पोलीस खात्याच्या वतीने श्रद्धांजली म्हणून त्यांना सलामी देण्यात आली.

नेहमीच सगळ्यांना सहकार्य करत गावच्या धार्मिक, सामाजिक क्रिडा क्षेत्रात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या निधनाने ते कार्यरत असलेल्या ठाणे पोलीस कार्यालयात तसेच दसपटी विभाग, टेरव गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, सुपूत्र व कन्या असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button