आपला जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेच्या दक्षता पथक क्र-२ ने मुंब्रा खाडीत केली धडक कारवाई

अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांचे दणाणले धाबे

ठाणे – ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेच्या दक्षता पथक क्र-2 ने आज मुंब्रा खाडीत अतिशय धाडसी अशी कारवाई केली. या कारवाईत 1 बार्ज त्यात पाणी शिरल्याने जागीच बुडाले तर उरलेले 2 बार्ज व 4 सक्षण पंप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्या तात्काळ पोलिसांकडे पुढील तपासाकरिता सोपविण्यात आल्या,

अनधिकृत रेती उपसा करणाऱ्या सेक्शन पंप बार्ज वर कारवाई करण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार (रेतीगट शाखा) राहुल सारंग, अव्वल कारकून सचिन भोईर, महसूल सहाय्यक दर्शन नटे, वाहन चालक विनोद बुरबुरे, पोलीस शिपाई सचिन थिटमे यांच्या पथकाने आज ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढेही अशा प्रकारे अनधिकृतपणे रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाया सुरुच राहतील, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button