आपला जिल्हा

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी,दापोली आयोजित मंगळागौर स्पर्धेला रूपाली चाकणकर आणि प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांची उपस्थिती

दापोली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेने दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत दापोली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य तालुकास्तरीय “मंगळागौर स्पर्धा-2023” प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या दापोली येथील रसिकरंजन हॅाल येथे या स्पर्धेला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा बॅंक संचालक दिशा दाभोळकर यांनी भेट दिली.

सदर स्पर्धेदरम्यान रूपालीताई चाकणकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.या वेळी महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांच्यासह या मंगळागौर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष साधना बोत्रे,दापोली महिला तालुकाध्यक्ष विनीता शिगवण,शहराध्यक्ष अमिता तलाठी,नगरसेविका अश्विनी लांजेकर,नगरसेविका रिया सावंत,राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button