कडवई गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मिलिंद चव्हाण

संगमेश्वर- तालुक्यातील कडवई गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मिलिंद चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
मिलिंद चव्हाण हे पत्रकार तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. चव्हाण यांनी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. गावातील रस्ते, तसेच स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्रदिन यासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.
“माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी महत्वाचा आहे; गावातील वाद विवाद संपवून संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे गावात एकोपा निर्माण होण्यासाठी आपले प्रयत्न असणार असे मिलिंद चव्हाण यांनी सांगितले.
मिलिंद चव्हाण यांची निवड होताच गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ विशाखा विजय कुवळेकर तसेच उपसरपंच श्री दत्ताराम ओकटे, ग्रामसेवक, सदस्य, तसेच विविध संघटना यांनी ग्रामस्थ यांनी मिलिंद चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.



