आपला जिल्हाक्राईम

निलिमा चव्हाणचा घातपात नाही; व्हीसेरा आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार – पोलिस अधिक्षक श्री.धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी – दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी दाभोळच्या खाडीत मृत अवस्थेत मिळालेल्या कुमारी. नीलिमा चव्हाणचे अनुषंगाने दाभोळ पोलीस स्टेशन अधिक तपास करीत असून आजवरच्या तपासात प्रथम दर्शनी निष्पन्न झालेल्याबाबी जिल्हा पोलिस कार्यालयातून आज स्पष्ट करण्यात आल्या. कु. नीलिमा हिचा Postmortem रीपोर्ट प्राप्त झाला असून त्यामध्ये कु. नीलिमाच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्व जखमा तसेच अंतर्गत जखमा (Internal Injuries) दिसून आलेल्या नाहीत.Postmortem Notes मध्ये, डॉक्टरांनी Viscera तपासणी करिता राखीव ठेवला असून लवकरच Viscera तपासणी रीपोर्ट प्राप्त होताच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे. Viscera रीपोर्ट प्रथम प्राधान्याने मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून लघु-न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोग शाळा, रत्नागिरी यांच्याशी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. Academic Dean & Prof. and Head, Forensic Medicine & Toxicology, Seth GS Medical College & KEM Hospital, Parel Mumbai यांच्याकडून पोलीसांनी मागविलेल्या अभिप्रायामध्ये, “डोक्यावरचे केस व भुवयांचे केस जाण्याचे कारण हे केशवपनमुळे नसून शवाच्या कुजण्याच्या शक्यतेमुळे” असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.आतापर्यंत कु. नीलिमा चव्हाण सोबत हॉस्टेलमध्ये राहणार्‍या मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी, नोकरीच्या ठिकाणी असणारे तिचे वरिष्ठ व सहकारी, बँकेतील नोकरवर्ग, पूर्वी नोकरीच्या ठिकाणी असणारे व्यक्ति, प्रवासा दरम्याने भेटणारे एस. टी. कंडक्टर, शेवटी पाहणारे, व CCTV footage मध्ये दिसणारे, स्थानिक मच्छीमार असे विविध १०४ साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या चौकशीत तसेच भरणे नाका, खेड येथील CCTV footage व जगबुडी नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी वावर असलेल्या महत्वाच्या स्थानिक साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या प्राथमिक पोलीस तपासात घातपाताचा पुरावा नाही. कु. नीलिमा चव्हाण हिची बॅग हस्तगत करण्यासाठी पोलीसांकडून ऑपरेशन बॅग सर्च सुरू. त्यामध्ये ४ होड्या, २ ड्रोन, Binoculars तसेच ८० पोलीसांची ८ पथकांद्वारे शोध मोहीम सुरू आहे.आजवरच्या तपासात प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याबाबत माहिती अथवा तथ्ये समोर आलेली नाहीत. पोलीस तपास अजूनही चालू असून साक्षीदारांकडे कसून चौकशी चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button