भार्गव येडगे ची नवोदय विद्यालयात निवड ; शिक्षक आणि पालकांचे अचूक मार्गदर्शन

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी सध्या रा. आरवली ता. संगमेश्वर येथील आरवली जिल्हा परीषद शाळेत शिकणा-या भार्गव तुकाराम येडगे याची नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
भार्गव चे वडील तुकाराम येडगे हे सामाजिक क्षेत्रात काम करत असून विविध पदांवर कार्यरत आहेत तर त्याची आई कुंदा येडगे ही आरवलीत महा ई सेवा केंद्र चालवते. भार्गव च्या अभ्यासासाठी त्याच्या आई – वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
भार्गव येडगे याला त्याचे नवोदय चे शिक्षक हरी मेटकरी यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भार्गव ने यश मिळवले तर त्याच्या आरवली शाळेचे मुख्याध्यापक अशोक जायभाये आणि शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन केले. भार्गव च्या रुपाने आरवली शाळेला नवोदय चे यश मिळाल्याचे मत मुख्याध्यापक अशोक जायभाये यांनी व्यक्त केले तर शिक्षकांनी भार्गव चे अभिनंदन केले.
आरवली ( ता. संगमेश्वर ) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील भार्गव येडगे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. इयत्ता पाचवीत असताना भार्गव येडगे याने यश मिळवल्याने पंचक्रोशीतून भार्गव येडगे याचे कौतुक होत आहे.



