आपला जिल्हा

भास्कर जाधव सोमवारी पिंपळी गावच्या दौऱ्यावर ; सातपुते क्लिनिकचे करणार उदघाटन

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव सोमवारी (ता. २१) चिपळूण तालुक्यातील पिंपळी गावच्या दौऱ्यावर आहेत. पिंपळी येथे नव्याने सुरु होणाऱ्या डॉं. ओंकार शंकर सातपुते यांच्या रूग्णालयाचे उदघाटन आमदार जाधव यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता होईल. त्यासाठी आमदार जाधव चिपळूण तालु्क्याच्या पूर्व विभागाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी डॉ. इसाक खतीब, डॉ. सतीष देसाई, डॉ. समीर दळवी, डॉ.सुनील थत्ते, डॉ. दिलीप पाटील, डॉ. यतीन जाधव, डॉ. संतोष दाभोळकर, डॉ. हर्षद होन, डॉ. गोपिचंद वाघमारे, डॉ. परमेश्वर गोंड, डॉ. विजय रिळकर, डॉ. ज्योती यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. ओंकार सातपुते आणि डॉ. शंकर सातपुते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button