आपला जिल्हा

चिपळूण काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – भारताचे माजी पंतप्रधान, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज येथील चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात यानिमित्ताने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा चिटणीस सिकंदर नाईकवाडी, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, सचिव शमून घारे, ज्येष्ठ कार्यकर्त्या रविना गुजर, पेढे येथील विलास संसारे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, सेवादलच्या शहराध्यक्ष नंदा भालेकर, काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष मीरा नारकर, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार कामत, जिल्हा काँग्रेसचे चिटणीस कैसर देसाई, काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भूस्कुटे, अल्पसंख्याक सेलचे तालुका उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सरफराज घारे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलजार कुरवले, जिल्हा प्रवक्ते इब्राहिम दलवाई, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन मोरे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button