आपला जिल्हा

नांदिवसे बावलाई- धनगरवाडी रस्त्याचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

चिपळूण – तालुक्यातील नांदिवसे बावलाई धनगरवाडीकडे जाण्यासाठी रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच आ. शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. आता रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटल्याचे पहावयास मिळाले. तर ग्रामस्थांच्या आनंदात आपले समाधान असल्याची प्रतिक्रिया आ. शेखर निकम यांनी व्यक्त केली आहे.

नांदिवसे बावलाई-धनगरवाडीकडे जाण्यासाठी रस्त्याची सोय नव्हती. यामुळे येथील ग्रामस्थांना सुमारे ३-४ किलोमीटर पायपीट करावी लागत होती. तर विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. तरी बावलाई धनगरवाडीकडे जाण्यासाठी रस्ता व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आ. शेखर निकम यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेण्यात यश आले आहे.

या रस्त्याच्या भूमिपूजन कामप्रसंगी आ. शेखर निकम म्हणाले की, नांदिवसे बावलाई धनगरवाडीमध्ये १५ ते २० कुटुंब वास्तव्यास असून सुमारे १ कोटी २३ लाख रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थ व विद्यार्थी यांची गैरसोय दूर होणार आहे, यातच आपल्याला समाधान वाटत आहे, अशी भावना आ. शेखर निकम यांनी यावेळी व्यक्त केली. नांदिवसे गावामधे बरीच विकास कामे मार्गी लागली असून येणाऱ्या काळात उर्वरित जी कामे राहिलेली आहेत. ती लवकरच मार्गी लागतील, अशी ग्वाही यावेळी दिली.

यावेळी तालुका अध्यक्ष अबूशेठ ठसाळे यांनीही मार्गदर्शन केले. स्थानिक ग्रामस्थ भाई शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

तसेच नांदिवसे गावात आमदार निकम यांच्या मार्गदनातून जी विकासकामे झाली आहेत व होत आहेत, याबद्दल निकम यांचे आभार मानण्यात आले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, अॅड अमित कदम, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, गणेश कांबळी, दिनेश शिंदे, प्रकाश पवार, दिपक शिंदे, जयवंत अदावडे, राम वरक, भाई शिंदे, भरत दादा, अनंत कोकरे, सौ. दिशा दाभोलकर, सौ. मेघना शिंदे, गजानन साळवी, बाबाराम शिंदे, सतीश सुर्वे, महेंद्र शिंदे, मेघा शिंदे, दाभोलकर (जेई) स्थानिक ग्रामस्थ शांताराम गोरे, भगवान गोरे, अशोक बुरटे, भगवान शिंदे, दगडु शिंदे, दिपक गोरे, विजय हिरवे, लक्ष्मण बुरटे, धोंडीराम बुरटे, प्रकाश शिंदे, रमेश गोरे आदी वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button