आपला जिल्हा

राज्य महीला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; चिपळूण महीला आघाडीकडून स्वागत.

चिपळूण – महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या दौऱ्याच्या वेळी चिपळूण शहर आणि चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेस च्या पदाधिकारी आणि महीला आघाडी प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांनी सर्व महीलांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी रुपाली चाकणकर यांनी चिपळूण, खेर्डी शहरातील महीला पदाधिका-यांयमवेत संवाद साधत मार्गदर्शन केले.यावेळी रुपाली चाकणकर यांनी खेर्डी येथे महीलांसोबत सरबत घेत औपचारिक संवाद साधला. मनमोकळेपणाने महिलांसोबत संवाद साधल्याने प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांनी त्यांचे आभार मानले.

राज्यातील महीलांच्या बाबतीतल्या अनेक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांचा अधिक भर असतो. त्या जिल्हा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील महीलांबाततीत असणाऱ्या तक्रारींचा आढावा घेतला जाणार असून त्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत.

यावेळी चिपळूण पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम, महीला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, राष्ट्रवादी कॅांग्रेस चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष निलेश कदम, दशरथशेठ दाभोळकर , खेर्डी ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरडकर आणि इतर पदाधिकारी महीला आघीडी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button