आरोग्यवर्दिनी केंद्र वाशी तर्फ देवरुख वतीने आरोग्य शिबिराला भव्य प्रतिसाद
देवरुख - सुरेश सप्रे

देवरूख – नजीक असणारे आरोग्यवर्दिनी प्रा.आ.केंद्र धामापूर उपकेंद्र वाशी येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यात १८०ग्रामस्थ व विदयार्थि वर्गानी सहभाग घेतला
जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॅा.अनिरुध्द आठल्ये. तालूका आरोग्य अधिकारी डॅा..सोनावणे मॅडम याच्या आदेशानुसार बुरंबीचे वैद्यकिय अधिकारी डॅा.रायभोळे धामापुर च्या वैद्यकीय अधिकारी डॅा.भक्ती वाजे ,डॅा.वैभव हातीम, अशोक बोरसे, स्वाती गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर सपंन्न झाले.
आरोग्य शिबिरात योगा शिबीर, विविध रक्तचाचण्या, आभा कार्ड नोंदणी ,प्रधानमंत्री मातृत्व योजना कार्यक्रम , नेपकिन वाटप, नेत्र तपासणी व मोतिबिंदू तपासणी, डेग्णू,मलेरीया चाचणी ,घेवून शालेय विद्यार्थी वर्गाचीअसंर्सगजन्य रोग कार्यक्रमात तपासणी घेण्यात आली
यावेळी वाशी तर्फ देवरुख ग्रामपंचायतीचे सरपंच अनुष्का सावंत,उपसरपंच सुनिल सावंत, निकिता कंरडे, वाशीचे हायस्कूल व प्राथमिक शिक्षक वर्ग , तसेचमनिषा जाधव ,समिक्षा मोहिते ग्रामसेविका,बाळकृष्ण कंरडे,रमेश जौरत व ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी होणेकरीता वाशीचे सामुदाय अधिकारी अभिषेक नागरगोजे,मेघा टोंगे सामुदाय अधिकारी, प्रसाद व्हालकर ,प्रियांका इंगळे,प्रियाका कुवळेकर,स्नेहिकिंता सुपल आरोग्य सेविका ,प्रकाश झोरे,सतोष आग्रे,विजय राऊत सारीका गुरव आदींसह आशा वर्क्स व कर्मचारी यांनी आरोग्य शिबिर यशस्वी केले



