आपला जिल्हा

चिपळूण पॉवर हाउस चौक मृत्यूचा सापळा गतिरोधक बसविण्याची शिवसेना ( उबाठा ) पक्षाची मागणी

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – शहरातील पाग भागाकडे जाणारा रस्ता महामार्गाच्या कामामुळे धोकादायक झाला असून नागरिकांच्या दृष्टीने तेथून चालत वा दुचाकीने जाणे हा मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता आहे. पोलीस स्टेशन कडून किंवा कोर्टाकडून पाग भागात जात असताना पॉवर हाउस चौकात रस्ता ओलांडणे हे धोकादायक असून महामार्ग कार्यालय व स्थानिक प्रशासन त्यांनी त्वरित लक्ष देऊन दोन्ही बाजूला गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी,महिला संघटक वैशाली शिंदे व युवा शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांनी केली आहे. चिपळूण शहरातील पॉवर हाउस नाका येथे पागेकडून स्टॅन्डकडे जाताना किंवा कोर्टाकडे जाताना किंवा पाग मळ्याकडे जाताना महामार्ग ओलांडणे धोकादायक झाले आहे. साधारणता दोन हजार नागरिक दररोज महामार्ग ओलांडत आहेत. सदर महामार्ग ओलांडणे हे धोकादायक झाले असून तो मृत्यूचा सापळाच ठरत आहे. तरी महामार्ग अधिकारी संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन दोन्ही बाजूला गतिरोधक किंवा वेग दर्शक फलक लावावेत अन्यथा शिवसेना आंदोलन करेल असा इशारा चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button